ऑनलाईन भव्य पोवाडा गायन स्पर्धा 2020 चे आयोजन

पुणे : राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग (पुणे शहर)आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस (पुणे शहर) यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन भव्य पोवाडा गायन स्पर्धा 2020 चे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे आयोजन गिरीश गुरनानी (राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस) आणि संकेत शिंदे (चित्रपट व सांस्कृतिक विभागचे सरचिटणीस) यांनी केले आहे.
स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य आहे.
लहान गट (वय वर्षे ५ ते १५ वयोगट) आणि मोठा गट (वय वर्षे १६ ते त्यापुढील) अशा दोन्ही गटात स्पर्धा होणार असल्याचे स्पर्धेचे आयोजन गिरीश गुरनानी (राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस) यांनी सांगितले.
स्पर्धकाने आपला सादरीकरण व्हिडीओ weekendentertainments1015@gmail.com या संकेतस्थळावर दिनांक 22 नोव्हेंबर रात्री १२ पूर्वी नोंदवणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी 7276799331 किंवा 7020763608 या क्रमांकावर संपर्क साधावा.
स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक देण्यात येणार असून, प्रथम क्रमांकास सन्मानचिन्ह, राजा शिव छत्रपती कादंबरी, द्वितीय आणि तृतीय क्रमांकास सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

स्पर्धेचे नियम व अटी पुढीलप्रमाणे पोवाडा गायनाचा कालावधी जास्तीत जास्त १५ मिनिटे असावा, पोवाडा सादर करताना पारंपरिक वेशभूषा परिधान केलेली असावी, पोवाडा सादरीकरणात कोणतेही अक्षेपार्ह विधान विटंबनपर वाक्ये नसावी, पोवाडा गायनात पारंपरिक वाद्यांचा समावेश असावा, पंचाचा निर्णय अंतिम राहील.अधिकाधिक इच्छुकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक गिरीश गुरनानी यांनी केले आहे.









