पुणे शहर

१५ ते १८ वयोगटाच्या लसीकरणासाठी पुणे शहरात पाच लसीकरण केंद्र ; मुरलीधर मोहोळ

पुणे : १५ ते १८ वयोगटासाठी ३ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. या वयोगटातील लसीकरण मोहिमेसाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने शहरामध्ये पाच लसीकरण केंद्र तयार करण्यात आली असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

१५ ते १८ वयोगटासाठी शहरातील  कोरोना लसीकरण केंद्र!

१)कै.दशरथ बळीराम भानगिरे दवाखाना,महंमदवाडी, हडपसर
२) कमला नेहरू रुग्णालय,मंगळवार पेठ
३) कै.जयाबाई सुतार दवाखाना,कोथरूड
४)भारतरत्न स्व.राजीवगांधी हॉस्पिटल,येरवडा
५) कै.मुरलीधर लायगुडे दवाखाना,वडगाव खुर्द

१५ ते १८ वयोगटासाठी महत्वाचे
२००७ किंवा त्यापूर्वी जन्मलेले या लसीकरणासाठी पात्र असतील, १जानेवारी, २०२२ पासून Cowin वर नोंदणी,३जानेवारीपासून लसीकरणसुरु. ५० टक्के ऑनलाईन आणि ५० टक्के ऑफलाईन नोंदणी करण्याची सोय उपलब्ध. लसीकरणाला येतानाला भार्थ्यांकडे आधारकार्ड/ओळखपत्र आवश्यक असणार आहे.

नवीन लाभार्थी वयोगटासाठी कोवॅक्सिन लस देण्याचे निर्देश देण्यात आले असून त्या दृष्टीने लशीचा मुबलक साठा उपलब्ध करण्यात येत आहे.१८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करताना पुणे महापालिकेने उत्तम कामगिरी केली होती, तशीच कामगिरी या वयोगटासाठीही करण्याचा प्रयत्न असल्याचे मोहोळ यांनी सांगितले आहे.

Screenshot 20211227 1402344603556305344739789

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये