पुणे शहर

पुण्यातील लसीकरण केंद्रांची संख्या ५ वरून ४० पर्यंत वाढवली ; १५ ते १८ वयोगटासाठीची लसीकरण मोहीम..

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली माहिती..

पुणे : १५ ते १८ वयोगटासाठी ३ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. या वयोगटातील लसीकरण मोहिमेसाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने शहरामध्ये सुरवातीला ५ लसीकरण केंद्रावर लस दिली जाणार होती मात्र ती संख्या वाढवण्यात आली असून आता ४० लसीकरण केंद्रावर लस दिली जाणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

नवीन लाभार्थी वयोगटासाठी कोवॅक्सिन लस देण्याचे निर्देश देण्यात आले असून त्या दृष्टीने लशीचा मुबलक साठा उपलब्ध करण्यात येत आहे.१८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करताना पुणे महापालिकेने उत्तम कामगिरी केली होती, तशीच कामगिरी या वयोगटासाठीही करण्याचा प्रयत्न असल्याचे मोहोळ यांनी सांगितले आहे.

Screenshot 2021 12 31 19 48 05 54
Screenshot 2021 12 31 19 46 14 56

१५ ते १८ वयोगटासाठी महत्वाचे
२००७ किंवा त्यापूर्वी जन्मलेले या लसीकरणासाठी पात्र असतील, १जानेवारी, २०२२ पासून Cowin वर नोंदणी,३जानेवारीपासून लसीकरणसुरु. ५० टक्के ऑनलाईन आणि ५० टक्के ऑफलाईन नोंदणी करण्याची सोय उपलब्ध. लसीकरणाला येतानाला भार्थ्यांकडे आधारकार्ड/ओळखपत्र आवश्यक असणार आहे.

Screenshot 20211227 1402344603556305344739789

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये