पुणे शहर

पुण्यात रेल्वे प्रवाशांना अन्नातून विषबाधा; भारत गौरव यात्रेतील प्रकार

पुणे: चेन्नईहून येणाऱ्या भारत गौरव यात्रेच्या गाडीमध्ये प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री घडली. सर्व ४० प्रवाशांवर ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने उपचार केल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. आता सर्व प्रवाशांची प्रकृती स्थिर आहे.

Img 20230717 wa0012281292712276676815194924

चेन्नईहून पुण्याला येणा-या भारत गौरव यात्रेदरम्यान अनेक प्रवाशांची प्रकृती अचानक बिघडली. तपासणीत प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाल्याचे समोर आले. ही प्रवाशांनी बाब रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. मध्यरात्री रेल्वे पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचली. तात्काळ ससून रुग्णालयातील कर्मचारी व डॉक्टरांनी उपचारासाठी रेल्वे स्थानकावर धाव घेतली.

विषबाधा झालेल्या ४० प्रवाशांवर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली. प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नव्हती. रेल्वे प्रशासन आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. रेल्वे गाडीत खाद्यपदार्थांची सेवा देणा-यांची चौकशी केली जात आहे. याचबरोबर खाद्यपदार्थांचे नमुने तपासणी साठी ताब्यात घेण्यात आले आहेत.

Img 20231111 wa0004281292791598778819580777
Img 20230511 wa0002282296555721650380460122

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये