अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, सहकारनगर शाखेच्या वतीने वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

पुणे : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, सहकारनगर शाखेच्या वतीने नवी पेठेतील विठ्ठल मंदिराच्या सभागृहात वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीरचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी खोकला, ताप, अंगदुखी अशा आजारांची तसेच blood pressure check, या गोष्टींच्या तपासण्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या. सुमारे 300 वारकऱ्यांच्या या निमित्ताने तपासणी करण्यात आली. प्रत्येकाला आवश्यकतेनुसार मोफत मेडिसिन किट देण्यात आले. महासंघाच्या वतीने उपस्थित सर्व वारकऱ्यांना राजगिऱ्याच्या लाडूंची पाकिटे व मास्क वाटप करण्यात आले.
सहकारनगर शाखेच्या महिला आघाडी अध्यक्षा डॉ अर्चना जोशी, गीता देशमुख, वृषाली पुरकर, वृषाली खळदकर, अनामिका अत्रे, डॉ सोहम जोशी, मृदुला कुलकर्णी, शुभांगी दामले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.
नगरसेविका गायत्री खडके, माधवी कुंटे, मोहन ठेकेदार, सुलभा व दीपा देशपांडे तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष मंदार रेडे, जिल्हाध्यक्षा केतकी कुलकर्णी, प्रदेश पदाधिकारी विजय शेकदार, वृषाली शेकदार, सरचिटणीस राहुल जोशी, पेठ शाखा पदाधिकारी सचिन टापरे, मैथिली जोशी, सौ स्वाती फाटक आवर्जून सहभागी झाले होते.
