पुणे शहर

कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभागाच्या वतीने जोरदार दंडात्मक कारवाई

सोसायट्यांना बंद गांडूळ खत प्रकल्प सुरू करण्याच्या सूचना

कोथरूड : कोथरूड बावधन क्षेत्रीय पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने प्रभाग क्रमांक १०, ११, १२ या तीनही प्रभागातील आरोग्य कोठी अंतर्गत पुणे शहरात पावसाळा या ऋतूमध्ये आरोग्य विघातक परिस्थिती निर्माण होऊ नये, कोथरूड भागातील नदी-नाले व तलाव तसेच पावसाळी व ड्रेनेज लाईन स्वच्छ राहावे यासाठी कोथरूड उपनगरांमध्ये जनजागृती व जोरदार दंडात्मक कारवाई करण्यात आली.

कोथरूड भागातील १०० किलो पेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्यांच्या चेअरमन व सेक्रेटरी यांना प्रत्यक्ष भेटून ओला कचरा जिरवण्याबाबत घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने नोटीस देण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने सदर सोसायटी आपला ओला कचरा जिरण्यायासंदर्भात बंद पडलेले गांडूळ खत प्रकल्प व सेंद्रिय खत प्रकल्प चालू करणे विषयी विनंती करण्यात आली.

बंद पडलेल्या प्रकल्पासंदर्भात महानगरपालिकेच्या वतीने जनजागृती मोहीम सुरुवात करण्यात आलेली आहे. सदर सोसायट्यांनी बंद पडलेले खत प्रकल्प चालू करून आपला ओला कचरा आपल्या ठिकाणीच जिरवावा आपला ओला कचरा जिरवला नाहीतर मोठ्याप्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात येईल” असे आवाहन कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त केदार वझे व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांनी केले आहे.

रिकाम्या जागेमध्ये बीडीपी भागात राडारोडा टाकणाऱ्या कंत्राटदारास पंचवीस हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच बंद पडलेल्या खतप्रकल्प चालू करावा यासंदर्भात पाच हजार रुपये तसेच कोथरूड भागातील बांधकाम व्यवसायिक यांच्या बांधकामाच्या ठिकाणी जाऊन कीटक विभाग व आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता त्या ठिकाणी इमारतीमध्ये पाणीसाठे आढळून आले या पाणी साठ्यामध्ये डेंगू सदृश डासांची उत्पत्ती आढळून आली सदर ठिकाणी औषध टाकण्यात आले सदर पाणीसाठे नष्ट करणे विषयी बांधकाम व्यावसायिक यांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. अशा व्यावसायिकांकडून दहा हजार रुपये दंडात्मक शुल्क वसूल करण्यात आले.

Img 20220521 wa0000

शिवाय सार्वजनिक रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकून घाण करणाऱ्या २३ नागरिकांवर कारवाई करून पाच हजार रुपये दंड करण्यात आला. एकूण चाळीस हजार रुपये दंडात्मक कारवाई करून शुल्क वसूल करण्यात आले.

सदर कारवाई वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरीक्षक वैभव घटकांबळे, सचिन लोहकरे, करण कुंभार, गणेश चोंधे, गणेश साठे, नवनाथ मोकाशी, शिवाजी गायकवाड, संतोष ताटकर, . हनुमंत चाकणकर, रूपाली शेडगे, सतीश बनसोडे मोकादम वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे, अशोक खुडे, साईनाथ तेलंगी, अशोक कांबळे तसेच कीटक विभागाचे मलेरिया इन्स्पेक्टर अमोल हवालदार, गोटल, गवळी, ओबासे, पाष्टे व तोडे इत्यादी कर्मचाऱ्यांनी कारवाई करण्यास परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये