राजकीय

संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना इशारा; म्हणाले, यात पडू नये, नाहीतर…

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत त्यांना शिवसेनेत सुरू असणाऱ्या घडामोडींमध्ये न पडण्याचा सल्ला दिला आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना संजय राऊतांनी यासंदर्भात टोला लगावला.

संजय राऊत म्हणाले की, “देवेंद्र फडणवीसांना मी एक सल्ला देईन. तुम्ही या गोंधळात पडू नका. नाहीतर पुन्हा एकदा सकाळचं जे काही घडलं होतं, ते संध्याकाळचं होऊन जाईल. तुमची जी काही उरलीसुरली शिल्लक प्रतिष्ठा आहे, ती सांभाळून ठेवा. या गोंधळात तुम्ही पडू नका, फसाल. आमचं आम्ही बघून घेऊ.”

Img 20220610 wa0330

यावेळी बोलताना संजय राऊतांनी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महत्त्वपूर्ण निर्णय होणार असल्याची माहिती दिली. “राष्ट्रीय कार्यकारिणी कोणत्याही पक्षासाठी फार महत्त्वाची असते. आमच्या कार्यकारिणीच्या बैठकीत अनेक निर्णय होतील. पक्षाच्या भवितव्याविषयी, विस्ताराविषयी चर्चा होईल. काही नव्या नियुक्त्या होतील. राष्ट्रवादी आणि काँग्रेस उद्धव ठाकरेंच्या पाठिशी मजबुतीनं उभे आहेत. आजची राष्ट्रीय कार्यकारिणी महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणाला दिशा देणारी असेल”, असं ते म्हणाले.

Img 20220621 wa00078738131563619319629

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये