महागाईचा ‘जोर का झटका’; पेट्रोल-डिझेलसह सीएनजी महागला

पुणे : रोजच वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेल किमती आणि महागाईला सर्वसामान्य नागरिक वैतागले असतानाच आज सकाळीच त्यांना पुन्हा एकदा महागाईने ‘जोर का झटका’ दिला आहे. गेल्या 16 दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात 10 रुपयांनी वाढ झाली आहे. मुंबईत आज पेट्रोल 84 पैसे रुपयांनी वाढले असून पेट्रोल 120 रुपये 51 पैशांवर गेले आहे. डिझेलच्या दरात 85 पैशांची वाढ झाली असून 104 रुपये 77 पैसे डिझेल झाले आहे.
रोज वाढणाऱ्या पेट्रोल व डिझेल दरामुळे नागरिकांमध्ये नाराजी असताना, ‘आपल्याकडे पेट्रोलदरात झालेली वाढ फक्त पाच टक्केच आहे, काही विकसित देशांत तर 50 टक्के वाढ झाली आहे’, असे वक्तव्य पेट्रोलियममंत्री हरदिपसिंग पुरी यांनी मंगळवारी लोकसभेत केले आहे. पेट्रोल-डिझेलबरोबरच दिल्लीत सीएनजी गॅसही महागला आहे. गेल्या पाच दिवसांत सीएनजी सहा रुपये 60 पैसे किलोनं महागला आहे.




