पुणे शहर

धायरीत गारवा बिर्याणीच्या मॅनेजरचा खून

पुणे : धायरी येथे गारवा बिर्याणीच्या मॅनेजरला अडवून त्याचा खून करण्यात आला आहे. काम संपल्यानंतर दुचाकीवर घरी जात असताना अज्ञातांनी डोक्यात वार करुन त्याचा खून केला. आरोपी फरार असल्यामुळे हा खून नेमका का झाला याचं कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Img 20220910 wa00253950213425057106133

भरत भगवान कदम (वय २४, रा. धायरेश्वर प्राईड, मतेनगर, धायरी, पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ प्रकाश भगवान कदम यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भरत कदम हा गारवा बिर्याणी येथे मॅनेजर म्हणून काम करत होता. शनिवारी रात्री काम संपल्यानंतर तो दुचाकीवरुन घरी जात होता. यावेळी धायरेश्वर मंदिर ते पारे कंपनी चौक रस्त्यावरील निर्मिती असोसिएट्स बिल्डिंगच्या समोरील गायकवाड यांच्या रिकाम्या प्लॉटजवळ हल्लेखोरांनी भरतला अडवलं. त्यानंतर त्यांनी त्याच्या डोक्यात सपासप वार केले. त्यात तो तेथेच जखमी अवस्थेत पडला त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन पळून गेले.

या संपूर्ण घटनेची माहिती धायरी मार्शल यांना मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास मिळाली. सिंहगड रस्ता पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेव्हा भरत कदम याचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. तेथेच त्याच्याजवळ त्याची दुचाकी मिळून आली. तसेच त्याच्या खिशातील पैसे, पाकिट व अन्य साहित्यही तसेच होते. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाला नसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. भरत कदम याच्या खूनामागील नेमके कारण काय याचा शोध पोलीस घेत आहेत.

Img 20221012 192956 045 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये