पुणे शहर

मेट्रोचं काम वेळेत पूर्ण करण्याच्या अजित पवारांच्या सूचना


आज पहाटे केला पाहणी दौरा

पुणे : आज पहाटेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे स्टेशन, शिवाजीनगर, कोथरुड येथील मेट्रोच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी मेट्रोच काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या. 

पवार यांनी पुणे स्टेशनपासून मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाच्या पाहणीला सुरुवात केली.  महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्याकडून मेट्रोच्या कामाबाबत सविस्तर माहिती त्यांनी यावेळी घेतली.

मेट्रोच्या कामाचा आढावा घेताना पवार शिवाजीनगर येथे मॉडेल ट्रेननं प्रवास केला. यासह शिवाजीनगर कृषी महाविद्यालयाजवळील बोगद्याचं काम, व्हील पार्क (वनाज) येथील कचरा डेपोचं अत्याधुनिक मेट्रो डेपोमध्ये रूपांतर करण्यात आलेल्या कामाची देखील त्यांनी  पाहणी केली.

पवार यांनी पहाटेच या कामाची पाहणी सुरू केल्याने पुन्हा एकदा अधिकाऱ्यांची तारांबळ झाल्याचे पाहिला मिळाले. काही दिवसांपूर्वीच पवार यांनी आसाच पाहणी दौरा केला होता.

Img 20200925 112727

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये