पुणे शहर

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे विस्मरण झालेले गजनी अरविंद शिंदे – शिवसेनेचा टोला

पुणे : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव एवढा वाढत चाललेला असताना, काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक असून देखील अरविंद शिंदे यांना या गोष्टीचे विस्मरण होत आहे.राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या सर्व प्रकारच्या बैठका ऑनलाईन घेणेबाबत आदेश निर्देशित झालेले आहेत.  महापालिकेतील पक्षनेतेपदाची जबाबदारी काढून घेतल्यामुळे सध्या ते अतृप्त आत्मा असल्यासारखे वागत आहेत, कदाचित त्यामुळे ते महापालिकेच्या सभेची नियमावली विसरलेले दिसत आहेत. असे शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे आणि गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

IMG 20210221 WA0180

शिवसेनेने भ्रष्टाचाराला कधीही पाठीशी घातले नाही भविष्यातही कधी पाठीशी घालणार नाही. मुंबई महानगरपालिकेमधे सातत्याने शिवसेनेला एकहाती सत्ता गेली 25 वर्ष मुंबईकर जनता उगाचच देत नाही, याचेही विस्मरण कदापि होता कामा नये. शिंदेंनी कालचे विधान काँग्रेस पक्षश्रेष्ठींचे लक्ष वेधून घेण्यासाठी केलेले दिसून येत आहे. कारण यामुळे काँग्रेसचे पुणे शहराचे अध्यक्ष होण्यास मदत होईल असे त्यांना वाटत असावे. त्यांनी केलेले वक्तव्य हे वैयक्तिक आहे की पक्षाचे आहे हे सुध्दा सांगणे आवश्यक होते. असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये
Close
Close