कोथरूडकरांनी अनुभवली नादगंधच्या गुरुवंदना कार्यक्रमात गायन, वादनाची सुरेल मैफल

कोथरुड : pune city, kothrud ‘नादगंध’ तबला क्लासचे संचालक गोपाळ धुमाळ व विद्यार्थी वर्गातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘गुरू वंदना’ कार्यक्रमात गायन वादनाची मैफिल कोथरुडकरांनी अनुभवली. या मैफलीत सादर झालेल्या गीतांना उपस्थित रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली.
कार्यक्रमामध्ये श्रावणी दिक्षित या विद्यार्थिनीने गायलेल्या
घागर घेऊन…. आणि अरे कान्हा अरे कॄष्णा या दोन गाण्यां मुळे वातावरण संगीतमय झाले होते. या गाण्याला तबल्याला सुंदर अशी साथ ब्रम्हानंद टाक व अथर्व सोंडकर या विद्यार्थ्यांनी दिली होती…

पूर्वार्धात विद्यार्थ्यांचे समूहाने विविध तालामध्ये तबला वादन व सुगम गायन झाले. कार्यक्रमाची सांगता गुरुवर्य अशोकजी मोरे व गोपाळ धुमाळ यांच्या तबला सहवादनाने झाली. तिनताला मध्ये लयकारीच्या अंगाने पेशकार व तिसरं जातीचा कायदा वाजवून वादानाची सुरवात दमदार केली. नंतर रेला, गतकायदा व लालकिल्ला गत वाजवून श्रोत्यांच्या उत्स्फूर्त टाळया घेतल्या,शेवटी द्रुतमध्ये मुखडे, तुकडे , चक्रदर, फर्माईश, बंदीशी व लाग्गी चे विविध प्रकार वाजवून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत आपल्या वादनाची व कार्यक्रमाची सांगता केली. हार्मोनियमची लेहरा साथ अमोल मोरे यांनी केली.



कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित वाराणशीवार यांनी केले.
चंद्रकांत महाराज वांजळे, नानासाहेब मारणे, सौ दीपाली डोख , सागर शेडगे, संतोष डोख ,बासरी वादक नामदेव पवार आदी यावेळी उपस्थित होते.



