PUNE : बापट म्हणाले, पुण्यातील विमानतळाचे स्थलांतर नाही पण…

पुणे : शरद पवारांनी जो प्रस्ताव आणला त्याला विरोध नसून त्याचं स्वागतच आहे पण पुण्यातील विमानतळाचे (Pune Airport) स्थलांतर होणार नाही, अशी भूमिका खासदार गिरीश बापट यांनी मांडली आहे. कोणाला सुप्याला तर कोणाला बारामतीला बांधायचं असेल तर त्यांनी बांधावं असा टोलाही त्यांनी लगावला.
लोहगाव विमानतळावर नागरिकांना आवश्यकता असणाऱ्या सुविधा वाढवल्या जातील. याआधी कार्गो लहान होता आता तोही मोठा करण्यात येणार आहे. येणाऱ्या काळात एका तासात 2300 लोकं ये जा करतील, असे व्यवस्थापन केले जाईल. 14 विमानं इथे पार्क करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले आहे. शरद पवारांनी जो प्रस्ताव आणला त्याला विरोध नसून त्याचं स्वागतच आहे. पश्चिम महाराष्ट्राला त्याचा उपयोगही होईल पण लोहगाव विमानतळ विस्तारीकरण होईल हे पक्कं आहे. याठिकाणी दळणवळणच्या सुविधा सुरळीत व्हाव्या या हेतूने हा प्रयत्न केला आहे. लष्करी विमानतळ असल्यानं सिव्हील विमानतळ राहणार आहे. यासाठी एक शिष्टमंडळ ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
बापट म्हणाले, लोहगाव विमानतळ हे मध्यवर्ती असून पहिल्यापासून हा परिसर लष्करी प्रदेश आहे. पुण्याचा विस्तार, व्यापार, विद्यार्थी एक सांस्कृतिक शहर पाहताना प्रवासी संख्या वाढत आहे. पुण्यात 70 ते 80 हजारापेक्षा अधिक प्रवासी वर्षाला प्रवास करत असतात. पुरंदर, बारामती विमानतळ याला विरोध नाही उलट ती प्रगतीचे लक्षण आहेत. पण पुणेकरांना बाकीचे विमानतळ सोयीचे नाहीत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.




