पुणे शहर

छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील स्वच्छतादूतांचा कृतज्ञता सन्मान; डॉ.अजय दुधाणे आणि मनीषा दुधाणे यांच्याकडुन उपक्रमाचे आयोजन 

पुणे : छत्रपती शिवाजीनगर, विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी  प्रभाग क्रमांक १२ छत्रपती शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी आयोजित सन्मान परिश्रम, समर्पण व जबाबदारीने काम करणाऱ्या, कर्तव्याप्रती निष्ठा असणाऱ्या स्वच्छतादूत कर्मचाऱ्यांचा कृतज्ञता सन्मान सोहळा आरोग्य कोठी, छत्रपती शिवाजीनगर गावठाण येथे पार पडला. प्रशस्तिपत्रक आणि भेटवस्तू देऊन या स्वच्छतादूतांचा गौरव यावेळी करण्यात आला 

घोले रोड क्षेत्रीय कार्यालय सहा. आयुक्त तिमया जंगले, छत्रपती शिवाजीनगर दक्षिण मंडल अध्यक्ष शैलेशजी बडदे, मंडल सरचिटणीस अपर्णा कुऱ्हाडे, प्रभाग १२ चे अध्यक्ष सुजीत गोटेकर तसेच आयोजक डॉ.अजय दुधाणे,सहआयोजिका मनीषा दुधाणे, आरोग्य निरीक्षक राहुल शेळके, आरोग्य निरीक्षक उदय सणस, मुकादम राजेंद्र गायकवाड, अमित शिंदे, सुबोध उत्तेकर , ऋषिकेश इंगळे, कृष्णा बताने आदी मान्यवर व सहकारी उपस्थित होते. 

Img 20250914 1217324761282817223663325

आयोजक डॉ.अजय दुधाणे म्हणाले,समाजातील प्रत्येक घटकाचे आपण देणे लागतो. स्वच्छता कर्मचारी देखील त्यातील एक महत्वपूर्ण घटक आहे त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचे गेली अनेक दिवस मनामध्ये होते. त्यातूनच हा कृतज्ञता सन्मान करण्याचं ठरवलं. समाजातील शेवटच्या घटकाच्या सेवेसाठी अविरत कार्य करण्याची अंत्योदयाची संकल्पना प्रामाणिकपणे राबविण्याचा हा एक प्रयत्न.

Img 20250508 wa00014407724251968801054

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये