बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेकडून बालनिकेतन आश्रमाला दिवाळी फराळ वाटप

पुणे : बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने अनाथांची माता समाजसेविका डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या सन्मती बाल निकेतन आश्रमाला दिवाळी फराळ वाटप करण्यात आले.
यावेळी डॉ.सिंधूताई सपकाळ, पतसंस्थेचे संस्थापक डॉ.दिलीप मुरकुटे, चेअरमन विजय विधाते, संचालक दिलीप शेलार, कायदेशीर सल्लागार पांडुरंग थोरवे, गणेश मुरकुटे, बाळासाहेब पिंजण, राम गायकवाड ,रामदास विधाते ,शीतल भुजबळ ,गणेश भुजबळ ,संतोष भोसले, राम लोणागरे आदी उपस्थित होते.

बाणेर नागरी पतसंस्थेच्या वतीने दरवर्षी अनाथ मुलांना फराळ वाटप करून दिवाळी साजरी करण्यात येते. तसेच गरीब नागरिकांना दरवर्षी सरंजाम वाटप देखील करण्यात येते.डॉक्टर दिलीप मुरकुटे म्हणाले, बाणेर नागरी चे सर्व संचालक बाणेर नागरी पतसंस्था अनाथ मुलांसोबत दरवर्षी दिवाळी साजरी करते यातून एक वेगळा आनंद निर्माण होतो. तसेच दरवर्षी समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे मिळणारे मार्गदर्शन जीवनाला नवीन प्रेरणा व आनंद देते.






