पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा किरण दगडे पाटील यांच्याकडून भव्य कट आऊट उभारून 300 किलोच्या पुष्पहाराने स्वागत व सत्कार

पुणे : आपुलकी आणि प्रेम असणाऱ्या आपल्या माणसांकडूनच अशा प्रकारे भव्य दिव्य असा सत्कार करण्यात येतो. किरण दगडे पाटील यांनी अशाच प्रेम भावनेतून माझा सत्कार केला असल्याचे मी समजतो.असे मत राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.
चंद्रकांत पाटील यांची पुणे जिल्हा पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी भव्य कटआऊट उभे करून तसेच क्रेनने 300 किलोचा पुष्पहार घालून मोठया उत्साहात बावधनमध्ये स्वागत केले.

यावेळी पुणे शहर प्रवक्ते भाजपा संदीप खर्डेकर,कोथरूड विधानसभासभा अध्यक्ष पुनीत जोशी, सरपंच पियुषा किरण दगडे पाटील, माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील,माजी नगरसेविका श्रद्धा प्रभुणे पाठक, पुणे जिल्हा युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदीप आबा सातव, सरचिटणीस जीवन साखरे,स्वीकृत सभासद वैभव मुरकुटे,राजाभाऊ जोरी,स्वीकृत सभासद बाळा टेमकर, प्रभाग अध्यक्ष सागर कडू, प्रभाग अध्यक्ष कैलास मोहोळ,राजेश मनगिरे, राजेश कुलकर्णी,विद्या टेमकर, सुप्रिया माझीरे प्रभाग 10 मधील सर्व पदाधिकारी, युवा मोर्चा सर्व पदाधिकारी, व सोसायटीतील नागरिक उपस्थित होते.



किरण दगडे पाटील म्हणाले, चंद्रकांत दादांचा सत्कार करण्याची मला संधी मिळाली. याचा मला आनंद आहे. कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणारे , आपुलकी जपणारे दादा आता पालकमंत्री झाल्याने पुणे शहरासोबतच जिल्ह्यातील ही विविध प्रश्न मार्गी लागणार आहेत.









