पुणे शहर

हेल्पिंग हॅण्ड कोथरूडचे अंध शाळेत अनोखी राखीपोर्णिमा साजरी,85 विद्यार्थिनींना खाऊ आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप 

पुणे : हेल्पिंग हॅण्ड कोथरूडच्या वतीने पूना स्कुल फॉर ब्लाइंड गर्ल्स’ (कोथरूड) मध्ये दृष्टीहीन विद्यार्थिनींनी अनोखी राखीपोर्णिमा साजरी केली.जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

 ‘समाजात जनजागृती निर्माण करणे आणि सामाजिक उपक्रमातून मदत करणे हा हेतू या उपक्रमाचा होता’असे हेल्पिंग हॅण्ड कोथरूड अध्यक्ष गिरीश गुरनानी म्हणाले, खाऊ आणि जीवनावश्यक वस्तू मिळाल्यानंतर  मुलींच्या चेहऱ्यावरील आनंद मनाला समाधान देणारा होता.

Img 20250508 wa0001235733770892078245

त्यांच्या कडून राखी बांधून घेत असताना त्यांच्या आशा आकांक्षा किती मोठ्या आहेत आणि स्वतंत्र जगण्याची उमेद किती जागृत आहे याची अनुभूती झाली असे हेल्पिंग हॅण्ड कोथरूड चे अध्यक्ष गिरीश गुरनानी म्हणाले संस्थेला काही आर्थिक मदत देखील केली. माझ्या या भगिनींना या जगात स्वतंत्र पणे जगता यावे याची जबाबदाऱ्या अपना सगळ्यांच्या खांद्यांवर आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांच्या या स्वातंत्र्याचे रक्षण करणे हीच सदिच्छा आणि प्रार्थना.

Img 20240404 wa0013282293280934616164697357

या वेळी अमोल गायकवाड ,सचिन यादव,संजय खोपडे,अमित भगत ,आधिराज कसबे, प्रीतम पायगुडे,संदेश कोतकर, आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये