बारावीचा निकाल जाहीर; 94.22 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, MHBHSE) इयत्ता बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा निकाल हा ९४.२२ टक्के इतका लागला आहे.
या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम या शाखांतील एकूण १४,४९,६६४ नियमित विद्याथ्र्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,३९,७३१ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १३,५६,६०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व निकालाची टक्केवारी ९४.२२ आहे.
सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा ९०.९१.टक्के आहे. बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard.in किंवा maharesult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे निकाल पाहता येणार आहे.



