महाराष्ट्र

श्रीकांत भारतीय यांना भाजपकडून विधानपरिषदेची उमेदवारी

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपले पाच उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड यांना पुन्हा संधी देण्यात आली असून नव्या तीन नावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांना भाजपकडून विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे.

Img 20220518 wa00135092505186750304354 2

विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांना भाजपकडून विधानपरिषदेसाठी संधी देण्यात येणार का, याची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू होती. मात्र यावेळीही पंकजा यांना डावलण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. पंकजा मुंडे या विधानपरिषदेत जाण्यासाठी उत्सुक होत्या. त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये तसे संकेतही दिले होते. मला विधानपरिषदेत जाण्याची संधी मिळाल्यास, मी त्या संधीचं सोनं करेन, असेही पंकजा यांनी म्हटले होते. रोहित पवारांना शह देण्याच्या हेतूने कर्जत-जामखेडमध्ये विधानसभेला पराभूत झालेल्या राम शिंदे यांना विधानपरिषदेवर घेण्यात आल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, यावेळी देवेंद्र फडणवीस हेदेखील पंकजा यांच्या विधानपरिषदेतील उमेदवारीसाठी सकारात्मक असल्याची चर्चा होती. मात्र, आता राज्यसभेपाठोपाठ पंकजा मुंडे यांची विधानपरिषदेत जाण्याची संधीही हुकली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.

Img 20220521 wa0000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये