कोथरुड

मनसेचे मंदार बलकवडे यांनी केलेल्या गणेश विसर्जन हौदात सातव्या दिवशी ३५० गणेश मूर्तींचे विसर्जन..

कोथरुड : pune city, Kothrud  देशप्रेमी मित्र मंडळ व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मंदार बलकवडे यांच्या वतीने एरंडवणे भागातील नागरिकांसाठी श्री गणपती विसर्जनसाठी करण्यात आलेल्या हौदामध्ये पाचव्या व सातव्या दिवशी मिळून ३५० गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे.

मागिल वर्षी गणेश विसर्जन हौद वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे झालेली नागरिकांची गैरसोय लक्षात घेता यंदाच्या वर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मंदार बलकवडे व देशप्रेमी मित्र मंडळाच्या वतीने एरंडवणे भागातील नागरिकांसाठी श्री गणपती विसर्जन हौदाची व्यवस्था गणेश नगर चंद्रशेखर बलकवडे चौक या ठिकाणी करण्यात आली आहे.

मंदार बलकवडे यांनी सांगितले की, सदर हौदामध्ये पाचव्या व सातव्या दिवशी मिळून ३५०  गणेश मुर्तींचे विसर्जन झाले, स्थिर हौदाची व्यवस्था केल्यामुळे नागरीकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. लहान मुला-मुलीं पासुन ते वयोवृध्द आजी आजोबांपर्यंत सर्वांनी या व्यवस्थेचा लाभ घेतला असून, विसर्जन हौदा जवळ करण्यात आलेल्या योग्य नियोजनाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. 

देशप्रेमी मित्र मंडळाचे केदार बलकवडे, रूपेश आटक, सतीश दिघे, प्रणव गरूडकर, गौरव विनेरकर, ऋषिकेश करंजावणे, विशाल खसासे, शेखर तारू, निखिल मराठे, कुंदन तळेकर, निहाल सातपुते, वेदांत पासलकर, प्रसाद माळी, दिनेश चौधरी यांनी पाचव्या व सातव्या दिवशी दिवसभर मुर्ती विसर्जनाची जबाबदारी योग्यरित्या पार पाडली.

Img 20210818 wa0002

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये