अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष..शपथविधी पूर्वीच खेळली चाल..

मुंबई : अजित पवार हेच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असणार आहेत. निवडणूक आयोगाकडे शपथविधी घेण्यापूर्वीच दाखल करण्यात आलेल्या याचिकेत राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवार यांचे नाव देण्यात आलेले आहे. त्यामुळे अजित पवार यांची ही सर्वात मोठी चाल असणार आहे.
शपथविधीपूर्वी चाळीस आमदारांच्या सह्या घेण्यात आल्या आहेत. अजित पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं चिन्हावर आणि पक्षावर दावा करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे केलेल्या याचिकेत तसं सांगण्यात आल आहे. अजित पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याबाबतचा ठरावही करण्यात आल्याची माहिती मिळत आहे, त्यामुळे ही आजची सर्वात मोठी घडामोड असणार आहे.
शपथविधीपूर्वीच ही खलबत झाली असल्याने अतिशय नियोजनपूर्वक अजित पवार पावले टाकत असल्याचे दिसत आहे. आता यावर शरद पवार यांच्या गटाकडून काय प्रतिक्रिया येणार हे पहावे लागणार आहे. अजित पवार जरा राष्ट्रीय अध्यक्ष झाले असतील तर पहिल्या राष्ट्रीय अध्यक्षांच काय त्यांना कोणत्या ठरावाने काढण्यात आलं याबाबत स्पष्टता येणे आवश्यक आहे.







