पुणे शहर

कर्वेनगरमध्ये रविंद्र धंगेकर यांचा दुचाकी रॅलीव्दारे नागरिकांशी संवाद

पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी कर्वेनगर परिसरात दुचाकी रॅली काढत मतदारांशी संवाद साधला. कर्वेनगर भागात ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते.

कर्वेनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून या दुचाकी रॅलीला सुरूवात झाली. कॅनॉल रस्ता , भालेकरनगर, भारत कॉलनी,  मावळे आळी, गोसावी वस्ती, हिंगणे होम कॉलनी अशा परिसरातून ही रॅली पार पडली. धंगेकर यांचे महिलांनी ठिकठिकाणी औक्षण करून स्वागत केले.

Img 20240404 wa00202522969115018664075

धंगेकर म्हणाले, लोककल्याणाचा, सर्वसमावेशी न्यायाचा हा नवा परिवर्तनाचा काळ आणि या काळात पुणेकरांचा लाभलेला प्रतिसाद म्हणजे विजयाची नांदीच. तुम्हा सर्वांच्या सहकार्याने प्रेम आणि आशीर्वादाने लोकसभेचा गड आपण नक्की सर करू असा विश्वास यावेळी व्यक्त करतो. यावेळी पदयात्रेत सहभागी सर्व कर्वेनगर आणि कोथरूडवासीयांना पुणे लोकसभा निवडणुकीत पंजाच्या समोरील बटन दाबून मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

Img 20240404 wa00142311409567432001146
Img 20240404 wa00154462680026350583661

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये