कोथरुड

भाजपकडून कोथरूडमधील प्रभाग ११ मध्ये गरजू नागरिकांना 2 वेळचे मोफत जेवण वाटप

कोथरुड : कोथरूड मधील प्रभाग ११ मधील हातावरचे पोट असणाऱ्या गरजू ६०० नागरिकांना भाजपा प्रदेशाध्यक्ष  आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून लॉकडाऊनच्या काळात दुपार आणि रात्री अशा दोन वेळेच्या  (पोळी आणि भाजी) मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या १७ दिवसांपासून हा उपक्रम चालू आहे.

या सूरु असलेल्या उपक्रमाला नागरिकांनी मनापासून शुभेच्छा दिल्या असून समाधानाची भावना देखील प्रकट केली आहे. या उपक्रमाबाबत नागरिकांनी चंद्रकांत पाटील आणि नगरसेविका छाया अजय मारणे यांचे मनापासून आभार मानले आहेत.

Img 20210522 wa0203

या उपक्रमासाठी भाजपा कोथरुड मतदारसंघ अध्यक्ष
पुनीत जोशी , भाजप कोथरुड व्यापारी आघाडी अध्यक्ष सुनील गेहलोत, नवनाथ जाधव, अजय मारणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाची व्यवस्था अनिता तलाठी, सुरेखा जगताप, संतोष घारे, अजय मारणे, मुकुंद शिर्के, ऋषभ मोकाटे यांनी केले होते.

सध्या लॉक डाऊनमुळे वस्ती विभागातील अनेक नागरिक अडचणीत आले आहेत. हाताला काम नसल्याने अनेकांची  आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे. त्यामुळे अशा कुटुंबांना मदतीचा हात म्हणून चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून मोफत दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याने नागरिकांना मोठा आधार मिळाला असल्याचे नगरसेविका छाया मारणे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये