पुणे शहर

कळपातील मेंढरांना पुस्तकेच दिशादर्शक ठरतील : साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ग्रंथोत्सव आणि व्याख्यानमालेचे उद्घाटन..

पुणेः- समाज माध्यमांच्या प्रभावामुळे कळपात चालणाऱ्या मेंढरांसारखी आपली अवस्था झाली असून आपली सद्सद विवेक बुद्धी आणि विचार पक्रीया बाजूला सारून कळपाच्या प्रमुखाचे अंधानुकरण करीत आहोत. या अंधानुकरणाच्या प्रक्रीयेमुळे समोर खड्डा आहे की रस्ता याचा सारासार विचार न करता आपण वाटचाल करीत आहोत. ही वाटचाल योग्य दिशेने होण्यासाठी दिशादर्शक म्हणून पुस्तकेच सहाय्यभूत ठरतील, असे मत प्रसिद्ध साहित्यीक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.

ओंकार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वारजे जकात नाका येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे दिनांक 12 तेे 16 डिसेंबर दरम्यान आयोजित भव्य ग्रंथोत्सव आणि व्याख्यानमालेचे उद्घाटन आज देशमुख यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यंदा ग्रंथोत्सवाचे आणि व्याख्यानमालेचे नववे वर्ष आहे. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे संयोजक पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष स्वप्नील दुधाने तसेच प्रसिद्ध लेखक आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह वि.दा. पिंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोथरूड विधानसभा परिसर उपाध्यक्ष  संतोष बराटे, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आनंद तांबे, कोथरुड युवक अध्यक्ष प्रमोद शिंदे, किशोर शेडगे, सुनीता पवार, गजानन कड, विजय दुधाने आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेेळी बोलतांना लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले की, हे ग्रंथ प्रदर्शन म्हणजे अक्षरांचा शब्दोत्सव असून या प्रदर्शनाच्या माध्यमातून शब्दांची पूजाच जणू मांडली आहे. धार्मिक उत्सवांपेक्षा असे ग्रंथोत्सव सातत्याने होत राहिल्यास आपला देश प्रगती करेल. पुस्तकांमधून मिळणाऱ्या विचारधनामुळे कृतार्थ आणि संपन्न जगण्याचे मार्ग खुले होतात. ज्या शहरात उत्तम शाळा आणि उत्तम ग्रंथालये आहेत, ती शहरे मला उड्डाणपूल आणि मल्टीप्लेक्स असलेल्या शहरांपेक्षा अधिक जवळची वाटतात.

ते म्हणाले, समाज माध्यमे, ओटीटी व्यासपीठ, टीव्ही या सर्व माध्यमांव्दारे आपल्या विचारांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. तुमची विचारप्रक्रीया खुटीत करून आम्ही जे दाखवतो आहोत, तेच तुम्ही पहावे आणि तेच सत्य मानावे असे प्रयत्न दिसून येत आहेत. या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी वाचन संस्कृृती विकसीत झाली पाहिजे. मनुष्यप्राणी इतर प्राण्यांपेक्षा वेगळा गणला जातो कारण मनुष्य प्राण्यास उदात्त भावना, भाषा, संस्कृती, हास्य आणि रडणे या पाच देणग्या मिळाल्या आहेत.

Fb img 1639293615338

यावेळी पिस्तुल शुटींग वर्गवारीतून राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक पटकावल्याबद्दल साहिल दुधाने याचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध लेखक आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह वि.दा. पिंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष स्वप्नील दुधाने यांनी केले.

या व्याख्यानमालेत सोमवार दिनांक 13 डिसेंबर 2021 रोजी संध्याकाळी 7.00 (सात) वाजता, वारजे जकात नाका येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ‘मराठी साहित्यातील विनोदी परंपरा’ या विषयावर प्रसिद्ध व्याख्याते श्याम भुर्के यांचे व्य़ाख्यान होणार आहे.  या सत्राचे अध्यक्षपद संजय बराटे भूषविणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.

Fb img 1639300298091
Screenshot 2021 12 12 15 46 16 32
Fb img 1639283457597
Fb img 1639300354217
Img 20211129 wa0128

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये