रतन टाटा यांचं निधन..
भारताच्या उद्योग क्षेत्राला भरारी देणारे प्रसिद्ध उद्योगपती,टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचं निधन झालं आहे. प्रकृती खालावल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांच निधन झाले, ते ८६ वर्षाचे होते. त्यांच्या निधनाने देशात हळहळ व्यक्त केली जात असून सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
रतन टाटा यांना रविवारी (6 ऑक्टोबर) रात्री रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रतन टाटा यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी स्वत: ट्विट करत आपल्या प्रकृतीची मीहिती दिली होती. “माझ्या प्रकृतीविषयी अफवा पसरली आहे. पण माझे वय लक्षात घेता आणि सध्याची माझी प्रकृती पाहता माझ्या काही वैद्यकीय तपासण्या केल्या जात आहेत. असं त्यांनी म्हंटल होतं.
प्रकृती खालावल्यामुळे रतन टाटा यांना ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूत दाखल करण्यात आले होते. अखेर त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त केला जात असून देशाने एक देवभक्त उद्योगपती गमावला अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.
ज्येष्ठ उद्योजक पद्मविभूषण रतनटाटा यांच्या निधनाने जगाने अनमोल रत्न गमावले, उद्योग जगताची अपरिमित हानी झाली आहे, भारतीयांच्या मनातील अढळ मानबिंदू अस्ताला जाणे धक्कादायक आहे. अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री पुढे म्हणतात, पद्मविभूषण रतन टाटा आपल्या कर्तृत्वाने अजरामरच राहतील. त्यांचे अस्तित्व हे आधुनिक भारतीय उद्योग जगतासाठी आधारवड ठरले होते. त्यांनी मुंबईवरही भरभरून प्रेम केले. मुंबईसाठी ते नेहमीच भरीव योगदान देत आले आहेत. महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राबरोबरच सामाजिक, लोक कल्याणकारी उपक्रमाला ते नेहमीच पाठबळ देत आले आहेत. त्यांच्याकडे उद्योजकतेची विशाल दृष्टी होती. त्यातही मानवता हा केंद्रबिंदू होता. अशा या महान भारत सुपुत्राला महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्या वतीने मुख्यमंत्री या नात्याने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो