कोथरुड
संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन
चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन
कोथरूड : संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने कोथरूडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात २६९ जणांनी रक्तदान करत आपले समाजाप्रती असलेले कर्तव्य बजावले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कोथरूड ब्रांच मुखी सुधीर वरघडे, सेवादल इन्चार्ज भरत इंगुळकर , अकाऊंटट शंकर चहाने, विनोद पाष्टे, प्रशांत जोगावडे, समीर पडवळ, आणि मिशनचे सर्व सेवादल अनुयायी यांचे योगदान या शिबिरास लाभले.
ससून हॉस्पिटलच्या वाय सी एम रक्तपेढी च्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर घेण्यात आले. रक्तदान शिबिरास दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल आयोजकांनी रक्तदात्यांचे आभार मानले.