पुणे शहर

पुणे शहराचा पॉझिटिव्हीटी रेट कमी असतानाही लेव्हल ३ चे निर्बंध कायम ठेवणे, हा पुणेकरांवर अन्याय : मोहोळ

पुणे : pune city ‘पुणे शहराचा पॉझिटिव्हीटी ४ टक्क्यांच्या आत असतानाही लेव्हल ३ चे निर्बंध कायम ठेवणे, हा पुणेकरांवर अन्याय आहे. मुंबईला एक न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय का? सलग महिनाभर पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांच्या खाली असून या पार्श्वभूमीवरच पालकमंत्री कोरोना आढावा बैठकीत निर्बंधातील शिथिलतेबाबत मागणी करत आलो आहे. महापौर म्हणून मी शहरातील व्यापाऱ्यांच्या पाठीशी असून याबाबत राज्य सरकारने न्याय देण्याच्या भूमिकेत राहावे व पुण्याचे निर्बंध शिथिल करावेत अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ Muralidhar Mohol यांनी केली आहे.

राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल
करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तर ११
जिल्ह्यांमध्ये लेव्हल ३ चे निर्बंध कायम ठेवण्यात आले. आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत घोषणा केल्यानंतर आज संध्याकाळी राज्य सरकारकडून अधिकृतपणे आदेश जारी करण्यात आले आहेत. निर्बंध कायम ठेवण्यात आलेल्या ११ जिल्ह्यांमध्ये पुण्याचाही समावेश असल्याने महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुण्याचा पॉझिटिव्ह रेट ४ टक्क्यांनी कमी असतानाही पुण्याचे निर्बंध शिथिल का केले जात नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केला असून या निर्णयामुळे पुणेकरांचा भ्रमनिरास झाला असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

नवीन आदेशानुसार २५ जिल्ह्यांमध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवता येतील. तर शनिवारी आणि रविवारी दुपारी चार वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवावी लागणार. उर्वरित ११ जिल्ह्यांमध्ये सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत दुकाने सुरु राहणार तर शनिवार-रविवारी दुकाने बंद ठेवावे लागतील.

निर्बंध कायम  ठेवण्यात आलेले ११ जिल्हे
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर,
सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, पालघर
जिल्ह्यांचा समावेश आहे. या 11 जिल्ह्यांमध्ये राज्य
सरकारने लेव्हल 3 चे निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय

Img 20210727 wa0218

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये