पुणे शहर

कोरोना काळात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या १५० डॉक्टरांचा नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्याकडून सन्मान..


पुणे : pune city नगरसेवक किरण दगडे पाटील  व बावधन बुद्रूकच्या सरपंच पियुषा किरण दगडे पाटील यांच्या वतीने प्रभाग क्र. १० कोथरुड – बावधन, तसेच बावधन बु. व मुळशी मधील १५० डॉक्टरांचा कोरोना काळात अमूल्य कार्य केल्याबद्दल सिनेदिग्दर्शक प्रवीण तरडे व सुर्यदत्त कॉलेजचे चेअरमन संजय चोरडिया यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. Corporator Kiran Dagde Patil honors 150 doctors who played an important role during the Corona period.

यावेळी डॉ. रवी कोठारी, डाॅ.सतेज कोठावदे , डाॅ.सुभाष गव्हाणे , डाॅ.सीमा पाटील, डाॅ.बाळकृष्ण गायकवाड , डाॅ.हिमांगी पाटसकर , डाॅ.सचिन वायदंडे , डाॅ.जयंत खोरे इनामदार , डाॅ.सचिन नागापूरकर , डाॅ.शिरीष धारस्कर , डाॅ.अजय तायडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे सतिश परळीकर, नीलकंठ  बजाज, चंद्रशेखर भिडे, उदय दाणी, किरण कुलकर्णी, प्रभाग १० अध्यक्ष सागर कडू व आदी मान्यवर उपस्थित होते.

किरण दगडे म्हणाले की, कोरोना सारख्या महाभयंकर महामारीच्या काळात डॉक्टरांनी आपले कर्तव्य योग्यरीत्या बजावल्याने आपण या संकटातून बाहेर पडत आहोत. सर्वजण भीतीच्या छायेखाली असताना डॉक्टरांच्या दोन दिलासादायक शब्दांनी अनेक रुग्णांना या आजारातून बाहेर पडण्याची ताकद मिळाली. आजही आपण या संकटातून पूर्णपणे बाहेर पडलेलो नाही. डॉक्टर्स आपले कर्तव्य न थकता पार पाडत आहेत, आणि म्हणूनच त्यांचा सन्मान करून आम्ही त्यांच्या कार्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.

Img 20210727 wa0218

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये