कोथरुडपुणे शहर

“आहे मजा जगण्यात या ” -सांगीतिक सुरेल जेष्ठ नागरिक दिन

पुणे : “आहे मजा जगण्यात या” या हिंदी व मराठी गीतांच्या ऑनलाईन फेसबुक लाईव्ह कार्यक्रमास जगभरातील रसिक श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला.  ‘निघालो घेऊन दत्ताची पालखी ‘या भक्तीगीताने कार्येक्रमाची सुरवात करण्यात आली.आनंदी भाव – भावनांचे वर्णन करणाऱ्या गीतांनी  रसिक श्रोते भारावून गेले.

कोथरूड येथील आनंदी  जेष्ठ नागरिक संघ व स्वीकृत सदस्य कोथरूड बावधन प्रभाग समिती बाळासाहेब टेमकर यांच्या वतीने जागतिक जेष्ठ नागरिक दिना निमित्त डॉ.अनघा राजवाडे यांचा ऑनलाईन गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अनघा राजवाडे यांनी ‘मेरा नाम चिन चिन चू ‘, कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी ‘,लटपट लटपट तुझं चालणं ‘, ‘बाबूजी धीरे चलना ‘, ‘ह्रिदयी जागा तू अनुरागा ‘, पदमनाभा नारायणा, ‘जिवलगा कधी रे येशील “, ‘माळाच्या मळ्यामंदी’, ‘पंछी बनू ‘,’दिस चार झाले मन ‘, “निगाहे मिलानेको जी चाहता है “, अशा अजरामर गीतांची जणू रसिकांना पर्वणीच दिली.’ गर्द सभोती रान साजणी ‘या नाट्यसंगीताला विशेष दाद मिळाली.
      
    ‘ओंकारा विठ्ठला, तूझ्या दारी येतो ‘या अनघाताइंनी संगीतबद्ध केलेल्या व  परभणीचे श्री दिलीप चारठाणकर यांच्या भक्तीरचनेनी या मैफिलीची सांगता करण्यात आली
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी   आनंदी जेष्ठ नागरिक संघाचे संस्थापक बाळासाहेब टेमकर,आनंदी जेष्ठ नागरिक संघ अध्यक्ष श्रीराम बेडकीहाळ,श्रीमती सुनीता भिसे,उदय रेणुकर,अच्युत कुलकर्णी,श्रद्धा वैद्य,विनायक आंबेकर,  सूर्यकांत भोकरे, देवयानी भोकरे, शोभा पांडे, मीनाक्षी थत्ते,अनुराधा अन्वीकर व सर्व पदाधिकारी व सभासद यांनी योगदान दिले
संस्थापक बाळासाहेब टेमकर यांनी उत्तम संयोजन केले व ऑनलाईन श्रोत्यांचे आभार मानले.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये