राष्ट्रीय

गुजरातमध्ये झुलता पूल नदीत कोसळल्याने 141 जणांचा मृत्यू; मृतांत महिला आणि 30 पेक्षा जास्त मुले

मोरबी : मच्छु नदीवरील झुलता पूल पाण्यात कोसळल्याने 141 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महिला व बालकांचाही समावेश आहे. 5 दिवसांपूर्वीच पूल वाहतूकीसाठी खूला करण्यात आला होता. झुलता पूल नदीत कोसळल्याची घटना घडताच बचाव दल घटनास्थळी दाखल झाले. तसेच जखमींना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाल्या. केबल ब्रिज (झुलता पूल) तुटल्याने सुमारे 400 ते 500 लोक मच्छू नदीत कोसळले आहेत. सर्व मृतकांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्याचे काम सुरू आहे. तर सुमारे 300 जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून हा पूल बंद होता. याच महिन्यात म्हणजेच दिवाळीच्या एका दिवसानंतर म्हणजेच 25 ऑक्टोबर रोजी तो वाहतूकीसाठी खूला करण्यात आला होता. दरम्यान, मृतांचा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिला प्रशासनाच्या वतीने हेल्पलाइन नंबर (02822243300) जाहीर करण्यात आलेला आहे. पुलाची क्षमता सुमारे 100 लोकांची आहे, मात्र रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने या पूलावर सुमारे 500 लोकांची गर्दी जमली होती. हेच अपघाताचे कारण असल्याचे सांगितले जात आहे.

Fb img 1647413711531 1

पूल कोसळल्यानंतर प्रशासन स्थानिक लोकांच्या मदतीने नदीत पडलेल्या नागरिकांची सुटका करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गेल्या 6 महिन्यांपासून हा पूल बंद होता. सुमारे दोन कोटींच्या निधीतून या पुलाच्या दुरूस्तीचे काम पूर्ण झाले करण्यात आले दिवाळीच्या एका दिवसानंतर म्हणजेच 25 ऑक्टोबर रोजी ते सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आला होता.

Img 20221012 192956 045 1

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी चर्चा करून बचाव कार्याची माहिती घेतली. सीएम पटेल म्हणाले- मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. जखमींवर तातडीने उपचार करण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या. याबाबत मी जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे. दरम्यान, अपघातावरून काँग्रेसने भाजप सरकारला घेरले आहे. निवडणुकीच्या घाईत भाजपने हा पूल जनतेसाठी लवकर खुला केल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. याशिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या घटना दुःख देणारी असल्याचे म्हटले आहे.

पूल 140 वर्षांहून अधिक जुना

मोरबीचा हा झुलता पूल 140 वर्षांहून जुना असून त्याची लांबी सुमारे 765 फूट आहे. हा झुलता पूल केवळ गुजरातच्या मोरबीचाच नाही तर संपूर्ण देशाचा ऐतिहासिक वारसा मानला जात असे. 20 फेब्रुवारी 1879 रोजी मुंबईचे गव्हर्नर रिचर्ड टेंपल यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. 1880 मध्ये त्यावेळी सुमारे 3.5 लाख खर्चून हा पूल बांधण्यात आला आहे. त्यावेळी हा पूल बनवण्याचे सर्व साहित्य इंग्लंडमधूनच आयात करण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये