महाराष्ट्र

करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरासह सर्व मंदिरे उद्या पासून खुली : भाविकांना दर्शनासाठीची नियमावली

कोल्हापूर : राज्यातील मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उद्यापासून सुरु करण्या राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र कोरोना संबंधीचे नियम पाळणे बंधनकारक असल्याचं राज्य सरकारने सांगितलं आहे. त्यानुसार राज्यातील सर्वच प्रमुख मंदिर संस्थानांनी आपली नियमावली तयार केली आहे.

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरही उद्यापासून सुरू होत आहे. यानिमित्ताने देवस्थान समितीने नियमावली तयार केली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अंतर्गत अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिर यासह सिंधुदुर्ग , सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील 3042 मंदिर उद्या खुली होणार आहेत. उद्यापासून भाविकांना सकाळी 9 ते 12 आणि सायंकाळी 4 ते 7 या वेळेत दर्शन घेता येणार आहे.

Img 20201114 wa0195

भाविकांना दर्शनासाठीची नियमावली
1.दिवसभरात तीन हजार भाविकांना दर्शन मिळणार
2. पूर्व दरवाजातून भाविकांना प्रवेश तर दक्षिण दरवाजातून भाविकांना बाहेर जाण्याचा मार्ग राहणार
3.मंदिराच्या आतील आवारातील दुकान बंद राहणार
4.भाविकांना कासव चौक-पितळी उंबऱ्या पासूनच अंबाबाई देवीचे दर्शन घ्यावे लागणार
5. भाविकांना मंदिर परिसरात फिरता येणार नाही
6. मंदिरात प्रवेश करताना भाविकांना थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर चा वापर करूनच प्रवेश मिळणार
7.मास्क नसेल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही
8.मंदिर आवारात कोणत्याही भक्ताने मास्क काढला असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार
9. 10 वर्षा खालील लहान मुलं आणि जेष्ठ वयोवृद्ध नागरिकांना तूर्तास दर्शन नाही
10. आठवडाभरात अंबाबाईचे दर्शन देखील ऑनलाईन बुकींग द्वारे करण्यात येणार

Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 35 pm
Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm
Screenshot 2020 1113 160133
Screenshot 2020 1113 155906
Screenshot 2020 1113 155933
Screenshot 2020 11 13 14 54 32 54
Screenshot 2020 11 13 14 53 26 61
Screenshot 2020 11 13 15 03 10 05

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये