महाराष्ट्र

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या सुधारीत शुल्क रचनेमुळे विद्यार्थ्यांना मिळणार परताव्याचा लाभ..    

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निर्देशानुसार सीओईपी प्रशासनाचा निर्णय

पुणे : सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या शुल्क रचनेबाबत विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रांतून प्राप्त झालेल्या निवेदनांची दखल घेत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुल्क रचनेत फेररचना करण्याचे निर्देश दिले आहेत.

या संदर्भात मंगळवारी (१८ ऑगस्ट) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दालनात अपर सचिव रेड्डी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

Img 20260222 wa00063491038201882637992

विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क परताव्याचा अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठी विद्यापीठाने शुल्क नियामक प्राधिकरणाच्या (FRA) मार्गदर्शक तत्त्वांनुसार विद्यार्थ्यांसाठी सुधारित शुल्क रचना करावी, असे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले. तसेच शुल्क रचनेतील ‘Other Fee’ हा घटक ‘Tuition Fee’मध्ये समाविष्ट करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

या सुधारीत शुल्क रचनेचा लाभ इतर मागासवर्गीय (OBC), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJ/NT), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (SEBC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तसेच विद्यार्थिनींना शासनाकडून मिळणाऱ्या शिक्षण शुल्क परताव्याचा अधिकाधिक लाभ मिळण्यास मदत होणार आहे.

विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन केल्याबद्दल सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ प्रशासनाने राज्य शासनाचे आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये