कोथरुड बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने जागतिक तंबाखू विरोधी निषेध दिनानिमित्त जनजागृती मोहीम..

कोथरुड : pune city कोथरुड बावधन क्षेत्रिय कार्यालय, पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने “स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ सर्वेक्षण मिशन – २०२२ अन्वये” “जागतिक तंबाखू विरोधी निषेध दिनानिमित्त जनजागृती मोहीम राबवण्यात आली.
नागरिकांनी व्यसनापासून दूर रहावे, पान, तंबाखू, गुटखा खाऊन सार्वजनिक रस्त्यावर कोणीही थुंकू नये,
पुणे शहर स्वच्छ राहावे, नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे आणि भारत देशातील तरुण पिढी बुद्धीमान, कर्तूत्वान, निरोगी आरोग्य संपन्न व्हावी म्हणून ही जनजागृती मोहीमकोथरुड बावधन क्षेत्रिय कार्यालयाच्या वतीने दरवर्षी राबवली जाते. या जनजागृतीपर कार्यक्रमाचे नियोजन महापालिका सहाय्यक आयुक्त केदार वझे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरीक्षक करण कुंभार व सचिन लोहकरे, प्रमोद चव्हाण, रूपाली शेडगे, यांच्या निरिक्षणाखाली मोकादम वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे यांनी केले होते.
सदर जनजागृतीपर मोहीम कार्यक्रम डहाणूकर कॉलनी, लक्ष्मीनगर, गोपीनाथनगर, गांधीभवन परिसर, शिराळकर चौक, कमिन्स कंपनी बाळासाहेब ठाकरे उद्याना समोर, कोथरूड गावठाण, कर्वे पुतळा चौक, शिवाजी पुतळा चौक, श्रावणधारा वसाहत बधाई चौक, मंत्री पार्क, तेजस मैदान, कोथरूड स्टँड आदी परिसरात राबवण्यात आली.
या परिसरातील प्रत्येक पान टपरीवर जाऊन सफाई कर्मचार्यांनी ” पान, तंबाखू, गुटखा खाऊ नका, आपले आरोग्य धोक्यात आणू नका..!”सार्वजनिक रस्त्यावर थुंकू नका, अनेक संसर्गजन्य रोगाना आमंत्रण देऊ नका….!”आपले पुणे शहर स्वच्छ ठेवा….!” आपल्या आरोग्याचे रक्षण करा,आपले कुंटूब धोक्यात आणू नका….!” विडी सिगारेट ओढू नका, कॅन्सर सारख्या महा भयंकर रोगाना आमत्रंण देऊ नका….! अशाप्रकारचे जनजागृतीपर फलक हातात घेऊन जनजागृती केली.

तसेच प्रत्येक पान विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना नागरिकांना थुंकण्यासाठी एक थुंकीपात्र व कचऱ्यासाठी स्वंतत्र डबा ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या. जनजागृतीपर कार्यक्रमात जनवाणीचे समिर आजगेकर, जयश्री पाटील, सेवा सह्योगचे चाबुकस्वार, कमिन्स इंडीयाचे कुणाल जाधव, परेश कुचेकर, शरद वावळकर, दत्ता जाधव, दत्ता कांबळे, प्रविण कांबळे आदी सेवकांनी परिश्रम घेतले.



