पुण्यात नोकरी मेळाव्यात 42 जणांना ऑफर लेटर

पुणे – येरवडा गांधीनगर येथील विरंगुळा केंद्र येथे माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या वाढदिवसानिमित्त राहुल हजारे यांच्या वतीने महानोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अनेक स्थानिक युवक आणि युवतींनी रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून विविध कंपन्यांना नोकरीसाठी अर्ज केले. यावेळी 42 होतकरू आणि गरजूंना त्या ठिकाणीच ऑफर लेटर सुद्धा विविध कंपन्यांच्या माध्यमातून प्राप्त करून देण्यात आले.

यावेळी स्थानिक आयटी आणि विविध क्षेत्रातल्या नामांकित कंपन्यांनी युवकांसाठी युवतींसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते मुकेश कानडे, निरंजन मराठे, आकाश पंडित, संतोष कांबळे, सुनील शर्मा, आरती भाटनागर, प्रियंका बॉस, राखी विजय चौगुले, अमोल पंडित, सुरेश क्षीरसागर यांच्या सह स्थानिक नागरिक उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माया ओव्हाळ तसेच न्यू होम फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.






