कोथरुड

कोथरुडमध्ये लता दीदींना स्वररुपी श्रद्धांजली..

कोथरुड: अजीब दास्ता है ये, रैना बीती जाय, हसता हुआ जो राणी चेहरा, वादा करो नही छोडेंगे तुम मेरा साथ, कोई लडकी है जब वो हंसती है अशा सादर झालेल्या सदाबहार गीतांनी कोथरुडकर रसिकांनी गायिका लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना स्वररुपी श्रद्धांजली वाहिली.

लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी
भारतीय जनता पार्टी, सांस्कृतिक आघाडी कोथरुडच्या वतीने मर्मबंध नाते सुरांशी प्रस्तुत स्वरमयी लता या लता मंगेशकर यांनी गायलेल्या सदाबहार गीतांवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे शहर भाजपचे सदस्य अजित जगताप व सुजाता जगताप यांच्या वतीने कोथरुड मधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

चित्रा, सुरेश, जया, यशवंत, सुहास यांनी या कार्यक्रमात गीते सादर केली. बच्चे मन के सच्चे, धीरे धीरे चल चांद गगन में, ये समा समा है ये प्यार का, सावन का महिना, कोरा कागज था ये मन मेरा, भोली सुरत दीलके खोटे, अशा गीतांना उपस्थित रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. कार्यक्रमाचे निवेदन विभा कर्णिक यांनी केले.

Img 20220213 wa0165
Screenshot 2022 01 29 09 52 08 45

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये