वस्ती विभागात विशेष लसीकरण मोहीम राबवल्याने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यास मदत होणार : हर्षवर्धन मानकर

कोथरुड : pune city, kothrud वस्ती विभागात विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात आल्याने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठी मदत मिळणार असल्याचे दीवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रवादीचे हर्षवर्धन मानकर यांनी सांगितले. Special vaccination campaign in slums will help prevent corona outbreak: Harshvardhan Mankar
मानकर म्हणाले, शहरात लसीकरण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, पण लसीकरणाबाबत काही अफवा पसरल्याने वस्ती विभागातील अनेक नागरिकांनी लसीकरण केले नव्हते, पण जनजागृती करून वस्ती विभागात विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात आल्याने कोरोना रोखण्यासाठी फायदा होणार आहे.

प्रभाग क्रमांक ११ मधील केळेवाडी हनुमाननगर, मेगासिटी भागात नगरसेवक दीपक मानकर यांच्या प्रयत्नातून महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेत मोठ्या प्रमाणात वस्ती विभागातील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण करून घेण्याचे आवाहन हर्षवर्धन मानकर यांनी केले आहे.






