पुणे शहर

कोथरुडकरांचा एकच वादा चंद्रकांतदादा पाटील घोषणांनी गावठाण दणाणले

भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचाही सहभाग

पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना सर्वच स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कोथरूड गावठाण, गुजरात कॉलनी, भेलकेनगरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे देखील रॅलीत सहभागी झाले होते. अखिल भारतीय क्षत्रिय महासभेनेही चंद्रकांत पाटील यांना आपला जाहीर पाठिंबा दिला.

विधानसभा निवडणुकीला आता काही दिवसच बाकी आहेत. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ आज कोथरूड गावठाण, भेलकेनगर, गुजरात कॉलनी भागातून बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी महिलांकडून औक्षण करुन पाटील यांना विजयासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Img 20241020 wa0001435697684176070576

रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथील गणेश मंदिरातील आरतीने झाली. यावेळी अखिल भारतीय क्षत्रिय महासभेनेही आपला जाहीर पाठिंबा चंद्रकांत पाटील यांना जाहीर केला. संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बादल सिंह ठाकुर यांनी पाठिंब्याचे पत्र चंद्रकांत पाटील यांना दिले.

यावेळी कर्नाटक मधील मेंगलोर विधानसभा मतदारसंघातील आमदार हरिश पुंजा, भाजप कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, माजी नगरसेविका मोनिका मोहोळ, हर्षाली माथवड, ॲड. वासंती जाधव, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, पुणे शहर युवा मोर्चा सरचिटणीस दुष्यंत मोहोळ, भाजपा नेते शाम देशपांडे, प्रभाग १२ चे अध्यक्ष अंबादास अष्टेकर, रिपाइंचे अध्यक्ष वसंतराव ओव्हाळ सह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Img 20240404 wa0016281297658999536660438617
Img 20240404 wa0013281298602993728148316202

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये