“मतदारांचा विश्वास हीच माझी ताकद : भीमराव तापकीर

वडगाव बुद्रुक, सिंहगड रोड, वारजे, माळवाडी भागांमध्ये तापकीर यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद
खडकवासला मतदार संघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार भीमराव तापकीर यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्यांच्या चौथ्या विजयासाठीचा प्रचार सध्या खडकवासला मतदारसंघात जोमाने सुरू आहे. सलग तीन कार्यकाळ यशस्वीरीत्या पार पाडल्यानंतर, निवडणुकीला सामोरे जात असताना तापकीर यांना नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण आणि शहरी भागांचा संगम असलेल्या खडकवासला मतदारसंघात तापकीर यांनी विकासाच्या कामांमुळे ठसा उमटवला आहे. वडगाव बुद्रुक, सिंहगड रोड, वारजे, माळवाडी आणि इतर भागांमध्ये तापकीर यांच्या प्रचार दरम्यान नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

“तापकीर म्हणजे विकास,” अशा घोषणा या सभांमध्ये ऐकायला मिळत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली परिसराचा झालेला कायापालट नागरिकांच्या मनावर ठसला आहे. मितभाषी स्वभाव आणि सादगीपूर्ण राहणीमान: तापकीर यांचे नागरिकांशी प्रामाणिक आणि साधे वर्तन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे, ज्यामुळे लोकांमध्ये त्यांच्या विषयी आपुलकीची भावना आहे असे पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
तापकीर म्हणाले, मागील तीन कार्यकाळांमध्ये त्यांनी विधानसभेत खडकवासला मतदारसंघाच्या प्रश्नांवर प्रभावी आवाज उठवला. यामध्ये मिळकतकराचा प्रश्न, पाणीपुरवठा, रस्ते सुधारणा आणि नागरी सुविधा यांसारखे मुद्दे उपस्थित केले. गेल्या पाच मतदारसंघात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवले आहेत ते फक्त कागदावर नसून सत्यात उतरले आहेत. याशिवाय, स्मार्ट शाळा, सोलर प्रकल्प, आणि मेट्रोचे जाळे यांसारख्या लोकहिताच्या कामांमुळे खडकवासला मतदारसंघाचा विकास वेगाने झाला आहे.
भिमराव तापकीर यांच्या नेतृत्वाखाली खडकवासला मतदारसंघ विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचेल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत. चौथ्या टर्मसाठी यशस्वी होण्यासाठी तापकीर आणि त्यांचे कार्यकर्ते पूर्ण ताकदीने काम करत असून “मतदारांचा विश्वासच माझी ताकद आहे,” असे ठामपणे सांगत तापकीर यांनी मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे.





