कोथरुडमध्ये आज फुटणार हास्याचे फटाके..

कोथरुड कला महोत्सवात आज भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, योगेश सिरसाठ यांचा कार्यक्रम
कोथरुड : श्री शिवसाम्राज्य प्रतिष्ठान (ट्रस्ट)च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोथरुड कला महोत्सव २०२१ मध्ये आज रविवारी सायंकाळी ६ वाजता चला तुफान येऊ द्या हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात अभिनेत्री श्रेया बुगडे, अभिनेता भाऊ कदम, कुशल बद्रिके, योगेश सिरसाठ आपल्या विनोदी अभिनयाने हास्याचे फटाके फोडणार आहेत.
शिवसेना गटनेते, नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांच्या वतीने या दोन दिवसीय कोथरुड कला महोत्सव २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे. आज चला तुफान येऊ द्या हा विनोदी स्किट वर आधारित मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहे तर उद्या सोमवारी स्वरसंध्या हा गायक महेश काळे यांचा शास्त्रीय गायनावर आधारित कार्यक्रम होणार आहे. कोथरुड मधील छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक चौक येथील तात्यासाहेब थोरात उद्यानात सायंकाळी ६ वाजता हे कार्यक्रम सुरू होणार आहेत. बढेकर ग्रुप व गोखले कन्स्ट्रक्शन हे या महोत्सवाचे प्रायोजक आहेत.
अभिनेता भाऊ कदम, कुशल बद्रिके, योगेश सिरसाठ, अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या विनोदी अभिनयाचे सर्वचजण चाहते आहेत. त्यांनी आपल्या अभिनयाने महाराष्ट्रातील जनतेला आपलसं करून टाकल आहे. कोरोना काळात यांच्या विनोदी अभिनयाने जनतेच्या मनावरील ताण हलका करण्याचे काम केले होते. त्यांचा लाईव्ह अभिनय आज कोथरुड वासियांना अनुभवता येणार आहे.







