पुणे शहर

कोथरूड मधील चांदणी चौकातील पाण्याच्या टाकीजवळ रोज लाखो लिटर होणारी पाण्याची गळती सापडली

किरण दगडे पाटील यांच्या तक्रारीनंतर सुरू झाली होती शोध मोहीम

कोथरूड : कोथरूड मधील चांदणी चौकात असणाऱ्या पाण्याच्या टाकी जवळ मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या पाण्याच्या गळतीमुळे लाखो लिटर पाणी रोज वाया जात होते. माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी केलेल्या तक्रारीनंतर पाण्याची गळती शोधण्याचे काम सुरू करण्यात आले होते. पाच दिवसानंतर आज पाण्याची गळती होत असलेले ठिकाण सापडले असून रोज लाखो लिटर होणारा पाण्याचा अपव्यय आता थांबणार आहे.

रोज लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने तातडीने या ठिकाणी होत असलेली गळती शोधून ती तातडीने थांबवावी याकरिता किरण दगडे पाटील यांच्याकडून अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू होता. आज रात्री उशिरा ही गळती कर्मचाऱ्यांना सापडली असून त्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्याचे समोर आले आहे.

कर्मचाऱ्यांनी कळलवनंतर किरण दगडे पाटील, वैभव मुरकुटे आणि कार्यकर्त्यांनी रात्री उशिरा प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असून गळती थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यास सांगितले आहे. तसेच मागील काही दिवसांपासून भुसारी व बावधन परिसरात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. ही गळती थांबल्यास काही आंशी येथील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे किरण दगडे पाटील यांनी सांगितले.

गळती सापडल्याने रोज लाखो लिटर वाया जाणारे पाणी थांबणार आहे. कर्मचाऱ्यांनी गळती थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. एवढया मोठया प्रमाणावर पाणी वाया जाणे चुकीचे आहे. पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी गांभीर्याने सतर्क राहून अशा होत असलेल्या गळती शोधून पाण्याचा अपव्यय थांबवणे आवश्यक आहे.

Img 20230717 wa0012281298961742807603730839
Img 20231109 wa001228129905032016030159557
Img 20230511 wa0002282292969174931887579613

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये