महाराष्ट्र

लॉक डाऊनचे निर्बंध २५ जिल्ह्यात शिथिल तर ११ जिल्ह्यात कायम..

मुंबई : राज्यातील 25 जिल्ह्यात लॉक डाऊन च्या निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली असून 11 जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे नियम कायम राहणार असल्याची माहिती  आरोग्यमंत्री राजेश टोपे Rajesh Tope यांनी दिली आहे. पुण्यातील निर्बंध ही शिथिल होतील अशी अपेक्षा नागरिकांना होती. दुकानांच्या वेळा वाढवण्यात येतील असे वाटत होते पण तसे न  झाल्याने पुणेकरांचा भ्रमनिरास झाला आहे. Lockdown restrictions relaxed in 25 districts and maintained in 11 districts.

राजेश टोपे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना  लॉक डाऊन बाबत वरील माहिती दिली आहे. टास्क फोर्सची आज  बैठक पार पडली.  25 जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे. तिथं सर्व निर्बंधांचे शिथिलीकरण करण्याचा निर्णय झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची फाईल वर सही झाल्यानंतर एक दोन दिवसात ही शिथिलता देण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितले आहे.

या अकरा जिल्ह्यात निर्बंध कायम. पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, कोकणात रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, मराठवाड्यात बीड आणि नगरमध्ये निर्बंध कायम राहतील.

निर्बंध शिथिल करण्यात आलेले जिल्हे
परभणी, लातूर, जालना, नांदेड, हिंगोली,
औरंगाबाद, उस्मानाबाद अमरावती, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशीम, हिंगोली, रायगड, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, नाशिक

IMG 20210727 WA0218

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये