पुणे शहर

कोथरूडमध्ये अवतरणार प्रभू श्रीरामाची अयोध्यानगरी.. ग्रामगणपती समस्त गावकरी मंडळ कोथरूडच्या देखाव्याचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते वासापूजन

कोथरूड : कोथरूडमध्ये यावर्षी गणेशोत्सवामध्ये प्रभू श्रीरामाची आयोध्या नगरी अवतरणार आहे. कोथरूड ग्रामगणपती समस्त गावकरी मंडळाच्या वतीने यावर्षी अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदिराचा भव्य देखावा साकारण्यात येणारा असून या देखाव्याच्या वासा पूजन आज केंद्रीय नागरी हवाई उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी कोथरूडचे ग्रामस्थ व मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Fb img 17548420640893459567206260010248

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले ८२ वर्षाची धार्मिक आणि संस्कृतिक परंपरा असलेले समस्त गावकरी मंडळ कोथरूड कायम सामाजिक उपक्रमात पुढे राहिले आहे. मी गणेश  मंडळाचा कार्यकर्ता आहे त्यामुळे मंडळांच्या कार्यक्रमाला जायला मला आवडते. समाजावर येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरे जाण्यासाठी सर्वप्रथम गणेश मंडळाचा कार्यकर्ता उभा असतो, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

यावेळी बोलताना चंद्रकांत मोकाटे म्हणाले, मुरली अण्णा हे आता आपले वैयक्तिक कोथरूडचे राहिलेले नाहीत ते आता देशाचे झाले आहेत. देशासाठी त्यांना आपण समर्पित केले आहे. त्यामुळे त्यांच्या वेळेला महत्त्व आहे. व्यस्त वेळेतून ते आज कोथरूड ग्रामगणपती, समस्त गावकरी मंडळाच्या वासापूजन कार्यक्रमाला आले त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो.

Img 20250508 wa0001235733770892078245

यावेळी उपस्थित  माजी नगरसेवक ॲड.योगेश मोकाटे, हनुमंत बोराटे, संजय मोकाटे, पतेश चव्हाण, शिवाजी गाढवे,  राहुल माथवड, प्रणीत चव्हाण, अमोल भगत, रोहीत मोकाटे, नंदू घाटे,राहुल केंजळे, जुगणु काझी, नितीन बोराटे, रोहन मांढरे, नयन खोमणे, आकाश खोमणे,  विजय मोकाटे,  बाळासाहेब मोकाटे, महादेव वामभिरे, नाना नागवडे, शंकरभाऊ मोकाटे, बुवासो भेलके,अरुण गुजर, भरत निंबाळकर, तानाजी गाढवे,  चंद्रकांत सुतार, ज्ञानोबा निकटे, भगवान कडू, संदीप संत, आप्पा बांदल, चंद्रकांत मुळीक, काळूराम मोकाटे, इंद्रजित मोकाटे, आबा मोकाटे तसेच समस्त ग्रामस्थ  मंडळी व नागरीक उपस्थित होते.

Img 20240404 wa0013282293280934616164697357

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये