महाराष्ट्र

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगूल आज वाजणार, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद


महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा आज निवडणूक आयोग जाहीर करणार आहे. यामुळे खऱ्या अर्थाने आज विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. आज दुपारी ३ वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे.

त्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात येणार आहेत. जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

Img 20240813 wa0013


महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. हरियाणा विधानसभेची मुदतही 3 नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे या दोन राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. तसेच 4 जानेवारी 2025 पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे. सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होऊ शकतात. 2019 मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये 21 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले होते. यंदा कधी मतदान होणार? हे निवडणूक आयोग आज जाहीर करणार आहे.

महाराष्ट्र विधानसभेत 288 सदस्य आहेत. महाराष्ट्रात सध्या महायुतीचे सरकार आहे. झारखंड विधानसभेत 81 सदस्य आहेत. या राज्यात 2019 मध्ये निवडणुका झाल्या होत्या. हरियाणामध्ये 90 जागा आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द करण्यात आले. जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे राज्य विभागले गेले आहे. याआधी 2014 मध्ये येथे शेवटची निवडणूक झाली होती.

Img 20240404 wa00123413096165072096535
Img 20240404 wa00134916733315783821383

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये