पुणे शहर

अमोल बालवडकर फाऊंडेशन व ॲटेनेक्स फिटनेस यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित मॅरेथॅानमध्ये 2500 कोथरूडकरांचा उत्स्फूर्त सहभाग 

पुणे : पंडीत फार्म कोथरुड येथे १५ ॲागस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अमोल बालवडकर फाऊंडेशन व ॲटेनेक्स फिटनेस यांच्या संयुक्त विद्यमानाने कोथरुड मतदार संघातील नागरीकांकरीता “Amol Balwadkar, Independence Day Run 2.0” चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 2500 नागरिक उत्स्फुर्त प्रतिसाद सहभागी झाले.

यावेळी प्रामुख्याने कोथरुड मतदार संघातील  व पुणे शहरातील युवक-युवती, ज्येष्ठ नागरीक, महिला, मुले यांनी हजारोंच्या संख्येने उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवुन या मॅरेथॅानमध्ये 3km, 5km व 10km धावण्याचा आनंद लुटला. तसेच ज्येष्ठ नागरीकांकरीता विशेष आयोजित केलेल्या “वॅाकेथॅानच्या” माध्यमातुन त्यांनी देखील या स्पर्धेचा आनंद लुटला. यावेळी सर्व सहभागी खेळाडुंना मेडल्स देवुन तसेच विजेत्यांना विविध बक्षिसे देवुन गौरवण्यात आले.

यावेळी बोलताना माजी नगरसेवक अमोल बालवडकर म्हणाले , स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आजच्या मॅरेथॅान स्पर्धेमध्ये कोथरूडकर नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याबद्दल मी कोथरुडकरांचे आभार व्यक्त करतो.हि मॅरेथॉन स्पर्धा सकाळी सहा वाजता सुरू राजाराम पुला जवळील पंडीत फार्म येथून सुरू झाली.पंडीत फार्म ते म्हात्रे पूल, म्हात्रे पुल ते नळस्टॉप चौक, नळस्टॉप चौक ते महर्षी कर्वे पुतळा चौक, महर्षी कर्वे पुतळा चौक ते खंडोजीबाबा चौक आणि खंडोजी बाबा चौक ते पंडीत फार्म असा 10 किलोमीटरचा मॅरेथॉनचा मार्ग होता.यामध्ये 3 किलोमीटर, 5, किलोमीटर आणि 10 किलोमीटर असे गट करण्यात आले होते.

Img 20240813 wa0013
Fb img 16474137115315333568191096823716
Img 20240404 wa00123413096165072096535
Img 20240404 wa00134916733315783821383

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये