पुणे शहर

ए चल बस्स.. म्हणत राज ठाकरे यांनी या प्रश्नाला उत्तर देणं टाळलं..

पुणे : Pune city महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्यानंतर त्यांनी शाखाध्यक्षांच्या निवडीची घोषणा केली. यानंतर घेण्यात आलेली पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

यावेळी ठाकरे यांना केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांची मुंबईत सुरू असलेल्या जन आशीर्वाद यात्रेबद्दल विचारण्यात आले, यावर त्यांनी ए चल बस्स… असं म्हणत राणेंच्या यात्रेवर बोलण्यास नकार दिला. Raj Thackeray refrained from answering this question

यावेळी मनसेच्या बदलेल्या झेंड्याबद्दल त्यांना  विचारण्यात आलं त्यावर ठाकरे म्हणाले, माझा जन्म कडवट मराठी, अत्यंत कडवट हिंदुत्वावादी घरात झाला आहे. पक्षस्थापनेपासूनच  “मनसेचा सध्याचा झेंडा माझ्या डोक्यात होता. तो कधी आणायचा हे सगळं सुरु होतं. त्यानंतर एके दिवशी तो झेंडा आणायचा हे ठरवलं. माझा जन्म हा कडवट मराठी आणि अत्यंत कडवट हिंदुत्वावादी घरात झाला आहे. त्यामुळे माझ्यावर झालेले संस्कार तेच आहेत. हे लक्षात ठेवावे.

सध्या पुण्यात बाबासाहेब पुरंदरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीवरून राजकारण पेटले आहे. यावरून चांगलेच वाद प्रतिवाद चालू आहेत. त्यावर ठाकरे म्हणले, बाबासाहेब पुरंदरेंना मी शिवशाहीर म्हणून भेटतो, ब्राह्मण म्हणून नाही. शरद पवारांना भेटतो तेव्हा मराठा म्हणून भेटत नाही. तुम्हाला भेटतो तेव्हा तुमची जात पाहून भेटत नाही. आपण यातून बाहेर पडलं पाहिजे असं ठाकरे यांनी म्हंटले आहे.

Img 20210818 wa0002

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये