पुणे शहर

जुना मुंबई -पुणे हायवेच्या कामाची आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्तांसोबत घेतली आढावा बैठक 

पुणे :  जुना मुंबई पुणे हायवे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्याबाबत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे व संबंधित विभागाचे अधिकारी यांचेबरोबर आज (बुधवारी) सविस्तर बैठक घेतली. 

बैठकीत जुना मुंबई पुणे हायवे रस्ता रुंदीकरणाचा आढावा घेण्यात आला, जय हिंद टॉकीजच्या पुढचा पट्टा लवकरच सुरु करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावर दुहेरी मार्ग सुरु करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. येत्या १० ते १५ मार्चपर्यंत हा रस्ता दुहेरी करण्यात येईल असे आश्वासन प्रशासनाकडून मिळाले असून. याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. नागरिकांना यातून लवकरच दिलासा देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील, असे आमदार शिरोळे यांनी बैठकीतील निर्णयांची माहिती देताना सांगितले. 

Img 20240202 wa00034606059587729487622

दुर्योधन भापकर, कार्तिकी हिवरकर, शैलेश बडदे, सचिन वाडेकर, प्रकाश सोलंकी, राहुल दुर्गे, तसेच पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे व पथ विभागाचे अधिकारी, वाहतूक विभागाचे अधिकारी, खडकी छावणी परिषदेचे अधिकारी, पोलीस प्रशासन, खडकीचे व्यापारी व नागरिक बैठकीला उपस्थित होते.

Img 20240202 wa00048471904785770913928
Img 20240202 wa00029218339254755901166

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये