पुणे शहर

मेट्रोच्या भुयारी मार्गाच्या कामाची पाहणी आमदार सिध्दार्थ शिरोळे यांनी केली

पुणे : मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यान सुरू असलेल्या भुयारी मार्गाची पहाणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज बुधवारी केली. भुयारी मार्गाचे काम लवकरच पूर्ण होईल, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गामध्ये मेट्रोची ५ स्टेशन्स होणार असून शिवाजीनगर सिव्हील कोर्ट येथील स्टेशनच्या कामाची पहाणी मेट्रोच्या अधिकाऱ्यांसमवेत केली. शिवाजीनगर बस स्थानक आणि शिवाजीनगर सिव्हील कोर्ट या भुयारी स्टेशनचे काम जून २०२२पर्यंत पूर्ण होईल, असे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी आमदार शिरोळे यांना सांगितले.

शिवाजीनगर सिव्हील कोर्ट ते स्वारगेटला जाणारा मुठा नदी खालील मेट्रोचा भुयारी मार्ग जमिनीच्या पातळीपासून सुमारे ३० मीटर खाली बनविण्यात येत आहे. तो नदीच्या तळाच्या १० मीटर खाली आहे. भुयारी मार्गाचे काम न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करण्यात येत आहे. मेट्रोचे काम अतिशय वेगाने चालू आहे, याबद्दल आमदार शिरोळे यांनी समाधान व्यक्त केले.

Img 20211129 wa0128

पुण्याच्या मेट्रोला २०१६ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकीर्दीत मंजुरी मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे भूमीपूजन करण्यात आले. या कामाचे प्रत्यक्ष परिणाम पुणेकरांना दिसू लागले आहेत. पुणेकरांनी भाजपवर विश्वास दाखविला त्याची ही पावती आहे, अशी प्रतिक्रिया आमदार शिरोळे यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये