पुणे शहर

पुण्यातील सात ओमायक्रॉन रुग्ण बरे झाले. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती

पुणे : पुण्यासाठी दिलासादायक बातमी आहे. पुण्यातील ओमायक्रॉनचा एकमेव रुग्ण बरा झाला आहे. तर पिंपरी-चिंचवड मधील सहा पैकी चार ओमायक्रॉनचे रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तर पुणे जिल्ह्यात पहिल्या डोसचे लक्ष पूर्ण झालं आहे, असंही अजित पवारांनी सांगितलं आहे. पिंपरी चिंचवडमधील सहापैकी चार ओमायक्रोन रुग्ण निगेटिव्ह झाले आहेत. यात 44 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष, सात आणि दीड वर्षीय मुलींचा समावेश आहे. तर 12 आणि 18 वर्षीय मुलींचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.

अजित पवारांनी सांगितलं की, दुसऱ्या डोसचे प्रमाण पहिल्या डोसच्या तुलनेत कमी आहे. ओमायक्रॉनमुळे लोक दुसऱ्या डोसलाही प्रतिसाद द्यायला लागलेत. पण जुन्नर, दौंड, पुरंदर आणि बारामती या चार तालुक्यात डोसचे प्रमाण कमी आहे. ते वाढवण्यास प्रशासनास सांगितलं आहे. येत्या आठवड्यात आम्ही या चार तालुक्यात दुसर्‍या डोससाठी प्रयत्न करणार आहोत. परंतु पुढच्या आठवड्यात या चार तालुक्यातील नागरिकांनी याला प्रतिसाद नाही दिला तर पुढील आठवड्यात आम्ही कडक निर्णय घेणार आहोत, असं अजित पवार म्हणाले.

Img 20211129 wa0128

अजित पवारांनी म्हटलं आहे की, कोरोनाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये तूर्तास कोणताही बदल नाही. परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, असं ते म्हणाले. बुस्टर डोसबाबात विचार सुरु आहे. पण त्यासाठी देशपातळीवर केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात यावा, असं अजित पवार म्हणाले. सीरम इन्स्टिट्यूटकडे बुस्टर डोस उपलब्ध आहे, असं ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये