पुणे शहर

मनसेची वाढत्या महागाई विरोधात निदर्शने

पुणे : प्रत्येक जीवनावश्यक वस्तू सरासरी 30 ते 50 % नी महाग झाली आहे तर भाजीपाला आणि कांदा 100 % नी महाग झाला आहे.कोणतीही भाजी 120 रु किलो कांदा 80 ते 100 रु इतका महाग झाला आहे. तेल सरासरी 30 ते 40 रु ने तर डाळी आणि कडधान्ये सुद्धा अशाच पद्धतीने महाग झाले आहे चहा पावडर सरासरी 50 ते 60 रु ने किलो मागे महाग झाली आहे सरकार हो जनतेने जगायचं कसं ? हा प्रश्न आहे. असा आरोप करित यावर तातडीने उपाययोजना करावी. या मागणीसाठी मनसेच्या वतीने अलका टॉकीज चौकामध्ये निदर्शने करण्यात आली.

Img 20201024 wa0166 1
Img 20201028 wa0145

मनसे शहर अध्यक्ष अजय शिंदे म्हणाले,  प्रचंड महागाई वाढत असताना राज्य सरकार महागाई कमी करण्यासाठी कोणत्याच पातळीवर सरकार काम करत नाही. सरकार मधील प्रमुख मंडळी हा केंद्राचा विषय हा समित्यांचा विषय असे म्हणून टोलवा टोलवी करत आहेत काही मंत्री तर परवडत नसेल तर खाऊ नका असे सल्ले देत आहेत .अस काम करणारया सरकारला जाग करण्यासाठी आणि महागाई कमी करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलने रस्त्या रस्त्या वर करू हा इशारा सरकारला देण्यासाठी मनसेने  टिळक चौका त निदर्शन केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेने च्या वतीने पुणे अलका टॉकीज चौकात महागाई विरोधात तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेने पदाधिकारी उपस्थित होते निदर्शनाची दखल न घेतल्यास सरकार ला सळो की पळो करण्याचा इशारा याठिकाणी देण्यात आला .
आंदोलनात मनसेचे शहर अध्यक्ष अजय शिंदे यांनी सरकार ला सळो की पळो करण्याचा इशारा दिला. यावेळी पुणे शहर अध्यक्ष अजयभाऊ शिंदे, उपशहर अध्यक्ष हेमंत बत्ते, प्रल्हाद गवळी, राम बोरकर, विभाग अध्यक्ष सुनिल कदम, सुधीर धावडे, प्रशांत मते, आशिष देवधर, वाहतूक पुणे शहर अध्यक्ष किशोर चिंतामणी, विभाग सचिव रमेश जाधव, आकाश धोत्रे, अभिषेक थिटे प्रभाग अध्यक्ष मनोज ठोकळ, महेश शिर्के, लक्ष्मण काते , कुलदीप घोडके, योगेश महिंद्रकर , बाळासाहेब शिंगाडे, शाम ताठे, सचिन काटकर, प्रवीण मिसाळ, उदय गडकरी, अभिषेक येनपुरे, जेमा चव्हाण, विनोद गायकवाड, राहुल कदम, पिंटू रसाळ, आदी पदाधिकारी उपस्थिती होते..

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये