महाराष्ट्र

Mansoon : या तारखेला महाराष्ट्रात येणार मान्सून; हवामान विभागाने सांगितली ही तारीख

पुणे : सध्या कर्नाटक आणि गोव्याच्या सीमेवर मान्सून रेंगळला असून नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या पुढील वाटचालीस अडथळे निर्माण होत आहेत. पुढील काही दिवसांत मान्सूनच्या आगमनासाठी महाराष्ट्रात पोषक हवामान तयार होईल, परिणामी १२ जूनपर्यंत राज्यात मान्सून दाखल होईल, अशी नवी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

Img 20220518 wa00135092505186750304354 2

शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असं आवाहन कृषीमंत्री दादा भुसे यांनी केलं आहे. राज्यात किमान ८० ते १०० मिलीमीटर पाऊस पडत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, अन्यथा दुबार पेरणीचं संकट ओढावू शकतं, असंही दादा भुसे यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रातील काही भागांत सोसाट्यांच्या वाऱ्यासह पूर्व मोसमी पावसानं हजेरी लावली आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या काही भागात अंशत: ढगाळ हवामान निर्माण झालं आहे. येत्या काही तासांत तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

Img 20220521 wa0000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये